खुंटिने प्रताप कैकईस – संत संताजीचे अभंग – २९
खुंटिने प्रताप कैकईस दाखविला ।
वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।१।।
भरतानी त्याग केला पादुकास मान दिला ।
दुःखते होतसे कैकईच्या जिवाला ।।२।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी ।
केली तुटा तुटी मायलेका ।।३।।
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
खुंटिने प्रताप कैकईस – संत संताजीचे अभंग – २९