लाठ माझी माता लाठ – संत संताजीचे अभंग – २५संत संताजी जगनाडे लाठ माझी माता लाठ – संत संताजीचे अभंग – २५ लाठ माझी माता लाठ माझा पिता । लाठी विना कांता विद्रुपची ।।१।। लाठी हीने मजला दिधली ती लाट । चुकवीली वाट जन्ममरणाची ।।२।। संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट । व्यर्थची खटपट करु नका ।।३।। वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. लाठ माझी माता लाठ – संत संताजीचे अभंग – २५