मरण मारून मरा – संत शेख महंमद अभंग
मरण मारून मरा । भाई हो मरण मारून मरा ।
सद्गुरुस्वामि सेउनि । आत्महित आधी करा ॥ १ ॥
कष्टि होऊनि कुडि पडे बापुडि ।
जिव हा पुट करि वेरझारा ॥छ ॥
मरतां कोण्ही न दिसे ।
जे सारा हाट गाडग्याचा फेरा ॥२॥
स्वप्निचि भावना । तैसे जीवीत्व जाणा ।
जना नको सो डंब अहंकारा ।
येम जेव्हां जीवा करिल यातना ।
तेव्हां काकुलति येसि गव्हारा ॥३॥
विजवट गहन । तैसे जन्म मरण ।
देहि या पाट जिवनि नितनोवरा ।
सदगुरु वचने मरण मारुनि उरा ।
सेख महमद विनिवितो योगेश्वरा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.