संत शेख महंमद अभंग

चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां – संत शेख महंमद अभंग

चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां – संत शेख महंमद अभंग


चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां ॥
निच भक्त तुझा सेवा करि ॥१॥
हरि उंच माझें ॥
निच तुझे तत्त्व तेणें वाढे तुझें महिमान ॥ २ ॥
हरि माझी धरणी ति तुझे पर्वत दिसे शोभिवंत ॥
माझ्याने तुझें ॥३॥
हरि तु माझा प्रजन्य ॥
मी तव तुझ्या नद्या ।
सिंधु जाल्या सुध्या मी तु तैस्या ॥४॥
हरि तु माझें राउळ ॥
मी सुधी केरसुणी ।
दरबार झाडुनि पडिलि आसे ॥५॥

हरि तुं माझा तरुवर ।
मी तुझें फुलफळ ॥
सोमति सकळ पत्रे खांद्या । ॥६॥
हरि तुं माझा सिउ ।
मी तवं तुझी शक्ति घरचार ।
हा व्यक्ति करूं दोधें ॥७॥
हरि सेख महमद दोना वाचा ।
भेद चाले आनादि सिध आणति साधु ॥८।
हरि तुं माझी विहीर ।
ती तवं तुझी मोट चालतिल पाट ॥
पीकति मळे ॥९॥
हरि तु माझे आकाश ।
मी तवं तुझा नाद ॥
प्रगट हा शब्द माझ्याने तुझा ॥ १०॥

हरि तुं माझा वोंकार ।
आकारिं मकार ॥
मा चा ची विस्तार ।
माझा तुझा ॥११॥
हरि मी भक्त यारुप ? तुच माझा बाप ।
आयायमने छेप तुझांत माझी ॥ १२ ॥
हरि तुं माझी साकर ।
मी तवं तुझी गोडी ।
ऐसि वाढे प्रौढि ।
माझी तुझी ॥१३॥
हरि तु माझा समुद्र मी तव लवण ।
षड्रसे अन्न सरतें होये ॥१४॥
हरि तूं माझे रत्नः मी तो तुझा कीळ ॥
कोंदनि सुढाळ माझा तुझा ॥१५॥

हरि तु माझे मोती मी तो तुझें पाणी ॥
घट स्थानिं स्थानीं । तुझा माझा ॥१६॥
हरि तुं सरता । माझ्यानें अव्यक्ता ।
निर्गुणी हे वार्ता कोण जाणे ॥१७॥
हरि तुं तेल वाति मी तंव तुझा जयोति ।
नाहिं तरि भ्रांति आंधार खरा ॥ १८ ॥
हरि तूं माझें पोट । मी तंव तुझी कांठि ।
बघ वागवितो कंठिं नाम तुझे ॥१९॥
हरि माझें नासिक मि तव तुझा ।
उस्वास जपमाळ सुरस आर्धउर्ध ॥ २० ॥

हरि येकविस हजर । सा शतें आजप ।
उच्चारी उभय । सेख महंमद ॥२१॥ I
हरि तुं माझा डोळा । मी अंत्र बाहुली ।
शरीर साउलि मीचि तुझी ॥ २२ ॥
हरि तुं माझे सिर मी तुझे पाउले ।
भाविके वंदिले तुझे म्हणउनि ॥२३॥
हरि पाउलें मी जालों ।
चलण आसे तुझें जगी ।
केलें माझें भुषण भक्ति ॥२४॥
हरि पाये नव्हति माझे ।
आवश तुंचि खरे ऐके सर्वेश्वरा ।
द्वैत माझे ॥२५॥

हरि पृथ्वी ळंका ।
मेरू धुरू लिंग ।
हरिसि माझा संग मी नदि जालों ॥२६॥
हरि तुं माझे तीर्थ मि भक्त कापडि ।
भजन आवडि माझें तुझें ॥ २७ ॥
हा नवविधी प्रतिष्ठा भक्ति आळंकार ।
मंडितुंना थोर । निज भक्तांचि ॥२८॥
हरि रवी ससि भक्त आरति उजळि ।
तारा दिप्ती मेळिं। वोवाळितों ॥२९॥
हरि तळीं शेपराजा ।
तो मी भक्त तुझा मानिसिना ।
माझा आभार काहीं ॥ ३० ॥

हरि गरुड रूद्र । कपनी लक्षुमी भवानि ।
पतिव्रताची खाणी । मज भक्तांची ॥३१॥
हरी तुज निर्गुणासि । सेख महमद बोले ।
आईकति भाविक श्रोतेराज ॥३२॥
हरि तूं वेद सिंध ।
ति श्रुतिस्मृति पाच वाचा ति ।
तुझ्याने माझ्या ॥३३॥
हरि तूं माझा परिस । मी तबं लोह धातु ।
माझ्याने तुझी मातु । वाढे पाहे ॥३४॥
हरि तूं माझा वैद। मी दुःखी रोगीस्थ ।
तुं ओषध पावत। मी पथ तुझी ॥३५॥

हरि तुं माझें तप । मी तुझी शांतता ।
दुसरी सायुज्यता । मीच तुझी ॥३६ ॥
हरि तुं कागद नि वरि अक्षरें।
पंडित विचारे मी बागेश्वरी ॥३७॥
हरि तूं अनगर मी तुझें सगर ।
चालति योगींद्र मजवरी ॥३८॥
हरि तुं माझें कांचन मी तुझें भूषण ।
लावेवरि कोंदण माझें तुझें ॥३९॥
हरि तु माझें सर्ग । मीच तुझे दळे ।
दुसरें पड़दाळे मीच तुझे ॥४०॥

हरि वड मी पारवि येका वृक्षा आंगी ।
सेख महमद जगा सांगति टिका ॥४१ ॥
हरि तु जाहाज । मी तुझे आ ले।
बंदर पावले मज भक्ताचे ॥४२॥
हरि तु माझा वारा । मी तुझी वाळवटि ।
मज चकोरां दृष्टि तुज चंद्रासि ॥४३॥ I
हरि तुं भयंक झळय मी त्याची मज ।
तुज दोहिचि प्रीति ऐसि ॥४४॥
हरि तु माझा आत्मा मी तुझी कल्पना ।
ऐके जगजीवना। भक्त हुणे आंगी ॥४५॥

हरि मी तुझे ऑगभूत तु माझ्याने ।
सरता जैसा सिंधु भरता। सरितानि ॥४६॥
हरि तू दिन निशि ॥
तु दादी मी मीसि चवि ।
रस्नेसि सेका वदना ॥४७॥
हरि तु झाकडू । ती सेवक गोडू ।
दोहींचा निवाडू । सेंदित जाला ॥४८॥
हरि वासें तृप्त । मन सेंधेने धाय पोट ।
ऐसा हाच तुष्ट तुझा माझा ॥४९॥
हरि भक्त सोडिना । निर्गुणा तुज खोडा ।
जैसा तो केवडा । केकति पोटिं ॥५०॥

हरि तमी श्रीत । सेख महंमद ।
जैसा चंदन उद । संनिधानें ॥५१॥
हरि धन गरज मि तुझी विद्युल्लता ।
चमकवता । तुझा नधी ॥५२॥
हरि तु माझा तास । मी तुझा नाद ।
अद्वैति वा द्वैत भेद । तुझ्यांत माझा ॥५३॥
हरि सारागंसिं । मी छतिस भार्या ।
स्वर तु आळवाया मुछना माझ्या ॥५४॥
हरि प्रकृतिसी ऐसि हे मीळणी ।
संभ्रम नटणी चौन्यासि लक्ष ॥५५॥

चराचरि हरि साकार मी माया ।
विळा सेविलिया । तुझी तुजमधे ॥५६ ॥
हरि माझा दोरा । मी तुझी बावडी ।
त्रीसूत्रे वोढी । मी भक्त पुंस ॥५७॥
हरि माझी रवी मी भक्त वारडि ।
गुसंळू परवडि महिशांति ॥५८॥
हरि मोणी तुप निज भक्त सेविति ।
ब्रह्मानंदे ढेकुर देति । उब्दोधाचे ॥५९॥
हरि धृतिचा सुगंध । उर्तिचा प्रकासें ।
जेवण समरसे भुक आभुकलि ॥६०॥

हरि तैसि भक्ति आद्वेत खरि ।
विवेकें तत्त्व हेरि । सेख महमद ॥६१॥
हरि गडकोठः मी भक्त कवाडे ।
चरया निवाडें बुरजी माझ्या ॥६२ ॥
हरि माझें कुलुप मी भक्त कीली ।
उघड झाप केली हरि ॥६३॥
याया जाया हरि माझें नासिक मी भक्त उचकी।
सींक जांभई गाजे की । माझी तुझी ॥६४॥
हरि माझे धनुष्य । मी भक्त सीत तिर ।
भातडि चतुर मी भक्त झालों ॥६५॥

हरि भांड़े गोळा ।
भक्त दारुरंजक आगा ।
जगजनक तुं माझा ॥६६ ॥
हरि नवरदेव । मी बासिंगे करवलि ।
वरमाये हळदुलि ति भक्त जालों ॥६७॥
हरि माझा हस्ति । मी भक्त अंबऱ्या ।
घांटा वाजति बऱ्या । मज भक्ताच्या ॥६८॥
हरि कात चुना । मी भक्त पानसुपारि ।
वीडडीया मुखा भीतरि । मी भक्त रंगलों ॥६९॥
हरि बारा आदर ।
भक्त दढावीस आंगोळ्या आंगुष्ठास ।
तुझी माझी गोडि ।॥ ७० ॥

हरि भक्ता भगवंताचा ।
निवाडा खल विदाचा ।
सेख महमदाचा अनुवाद ॥७१॥
हरि शुभ्र वस्त्रे मी भक्त राठसे ।
सोभीवंत दिवे । कुशळता ॥७२॥
हरि माझी धेनु । वासरुं मि भक्त ।
पान्हा तुं द्रवत । मज भक्ता मुखी ॥७३॥
हरि आठरा धान्ये ।
मी भक्त पक्वानें जेवण वालेपणें ।
दोहिचें खरे ॥७४ ॥
हरि माझा नृपति । मी भक्त भद्र ॥
शोभसि चतुर । भक्तिने बरा ॥७५॥

हरि माझा तेजी ॥ मी भक्त खासदार ॥
जीवन तुजवर । मी भक्त जालों ॥७६॥
हरि राज्यधर ॥ ति पालखि भोई ॥
छत्र कर सई ॥ तु कळस वरि ॥७७॥
हरि माझे जंत्र ॥ मी भक्त पीळण्या तारा ॥
वाजवाजवी मी बरा । ति भक्तसवदि ॥७८॥
हरि केळिचें झाड हरि केळांचा घड ॥
रुचि गोडि सुघड ॥ तुझी माझी ॥७९॥
हरि बळिराज सीभ्री चक्रवर्ति ॥

आशपुरी सकति ॥ तुज हरिचि ॥८०॥
हरि श्रीयाळ बळिराज ।
गोहि साक्षी लागी ॥ हरिचंद्र योगी
॥ सेख महंमद ॥८१॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां – संत शेख महंमद अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *