Skip to content
वेद वर्णिता शीणला – संत सेना महाराज अभंग – ९९
वेद वर्णिता शीणला।
मग मौन्यची राहिला ॥१॥
तेथें माझी वैखरी।
कैशी पुर्ण पावे हरी॥२॥
नेणती गोरा कीं सावळा।
त्याचि न कळेचि लीला॥३॥
हा सगुण की निर्गुण ।
गुणातीत परिपूर्ण ॥४॥
माथा ठेऊनि चरणीं सेना पाहे विलोकुनी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वेद वर्णिता शीणला – संत सेना महाराज अभंग – ९९