स्तुति करूं ऐसा नाहीं – संत सेना महाराज अभंग – ९८

स्तुति करूं ऐसा नाहीं – संत सेना महाराज अभंग – ९८

स्तुति करूं ऐसा नाहीं अधिकार।
शिणला फणिवर वर्णवेना ॥१॥
तेथें मी सरता होईन कैशापरी।
वर्णावया हरी कीर्ति तुझी॥२॥
आठराही भागले सहाही शीणले ।
चाऱ्ही राहिले मौन्यची ॥३॥
रुक्मादेवीवरें अंगिकार केला।
निवांत राहिला सेना न्हावी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्तुति करूं ऐसा नाहीं – संत सेना महाराज अभंग – ९८