Skip to content
करिता नित्य नेम – संत सेना महाराज अभंग – ९४
करिता नित्य नेम ।
रायें बोलाविले जाण ॥१॥
पांडुरंगें कृपा केली ।
राया उपरती झाली॥२॥
मुख पाहतां दर्पणीं।
आंत दिसे चक्रपाणी ॥३॥
कैसी नवलपरी ।
वाटीमाजी दिसे हरी रखुमादेवीवर ।
सेना म्हणे मी पामर ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
करिता नित्य नेम – संत सेना महाराज अभंग – ९४