करितां देवपूजा नित्य – संत सेना महाराज अभंग – ९३संत सेना महाराज करितां देवपूजा नित्य – संत सेना महाराज अभंग – ९३ करितां देवपूजा। नित्य नेम सारिला वोजा। मग आठविलें अधोक्षजा। ध्यानस्थ बैसलों ॥१॥ दूत आले लवलाही। राये बोलाविलें पाहीं। कोठें आहे मज दावी । उरी न ठेवी याची कांहीं ॥२॥ जाणुनि संकट श्रीहरी । धोकटी घेतली खांद्यावरी । त्वरें आला राजदरबारी । देखुनि हरी क्रोध निमाला ॥३॥ राया सन्मुख बैसून । हातीं दिधलें दर्पण । मुख पाहे विलोकून । मूर्ती दिसे चतुर्भुज ॥४॥ हात लाविला मस्तका। वृत्ती हरपली देखा । राम म्हणे प्राणसखा । नित्य भेटे मजलागी ॥५॥ मग केलें तेलमर्दन। घाटी बिंबला नारायण। विसरला कार्य आठवण । वेधलें मन रूपासी ॥६॥ भोंवतां पाहे विलोकून । अवघा बिंबला नारायण। तटस्थ पाहती सभाजन। नाहीं भान रायासी ॥७॥ राव म्हणे हरीसी । तुम्हीं रहावे मजपाशीं। तुजविण न गमे दिवसनिशीं । हरी म्हणे भाकेसि न गुंतें मी। ॥ ८॥ मग प्रधाने काय केलें। राया स्नानासी पाठविलें। रायें सोने दिधलें । हरीने ठेविलें धोकटींत ॥ ९ ॥ शुद्ध नाहीं याती। नाही केली हरिभक्ति। शिणविला कमळापती। नाहीं विरक्ति बाणली अंगीं ॥ १० ॥ नाहीं अपराधा गणीत । देखोनि सोने ब्राह्मणा देत। देवास घाली संकटांत। आण वाहत विठोबाची ॥ ११ ॥ सेना म्हणे ऋषीकेशी । मज कारणें शिणलासी। म्हणूनि लागलों चरणासी। संसारासी त्यागिलें ॥ १२ ॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. करितां देवपूजा नित्य – संत सेना महाराज अभंग – ९३