Skip to content
ऐशी आवडी आहे माझ्या – संत सेना महाराज अभंग – ९२
ऐशी आवडी आहे माझ्या जीवा ।
तुजसि केशवा निवेदिलें। ॥१॥
पांडुरंगा ऐसें वाटतसे जीवा ।
करिन संतसेवा अहन्निशी ॥२॥
नलगे वित्त गोत वैकुंठी राहणें ।
साज्युता सदनीं चाड नाहीं ॥३॥
करुणास्वरें सेना बहात विठ्ठला ।
हेतु पुरविला आवडीचा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ऐशी आवडी आहे माझ्या – संत सेना महाराज अभंग – ९२