अंगिकार केला – संत सेना महाराज अभंग – ९१
अंगिकार केला – संत सेना महाराज अभंग – ९१
अंगिकार केला।
भार चालवी विठ्ठला ॥१॥
संतीं सांगितलें ।
तें म्यां हृदयीं धरिलें ॥२॥
तारिला अजामिळ।
महा पापी की चांडाळ ॥३॥
पतितपावन।
करी नाम हे जतन ॥४॥
वागवी अभिमान ।
सेना न्हवी यातिहीन ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अंगिकार केला – संत सेना महाराज अभंग – ९१