असाल तेथें नामाचे चिंतन – संत सेना महाराज अभंग – ९०

असाल तेथें नामाचे चिंतन – संत सेना महाराज अभंग – ९०

असाल तेथें नामाचे चिंतन।
याहूनि साधन आणिक नाहीं ॥१॥
सोडवील माझा भक्ताचा कैवारी।
प्रतिज्ञा निर्धार केला आम्ही ॥२॥
गुण दोष याती न विचारी कांहीं।
धांवे लवलाही भक्तकाजा ॥३॥
अवघे काळीं वाचे म्हणा नारायण।
सेना म्हणे क्षण जाऊं नद्या॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

असाल तेथें नामाचे चिंतन – संत सेना महाराज अभंग – ९०