Skip to content
स्वभावें गाईन आवडीनें – संत सेना महाराज अभंग – ८४
स्वभावें गाईन।
आवडीनें तुझें नाम ॥१॥
हाचि माझा निर्धार ।
न करी आणिक विचार ॥ २॥
लोळेन तुझिये आंगणीं ।
निर्लज्ज होउनि मनीं ॥३॥
रंगीं नाचेन मना ऐसें।
पाहिन श्रीमुख सरिसें ॥४॥
सेना म्हणे संकल्प जीवा ।
हाचि निर्धार हेवा ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
स्वभावें गाईन आवडीनें – संत सेना महाराज अभंग – ८४