असतां वैकुंठासी काय सांगें – संत सेना महाराज अभंग – ८३

असतां वैकुंठासी काय सांगें – संत सेना महाराज अभंग – ८३

असतां वैकुंठासी।
काय सांगें ऋषिकेशी।
जाऊनि मृत्युलोकाशी।
जन भक्तिसी लावीं कां ॥१॥
आज्ञा वंदुनीया शिरीं।
जन्मलों न्हावीयाचे उदरीं ।
वाचे नाम निरंतरीं ।
रामकृष्ण गोविंद ॥२॥
कलियुगामाजी जाण ।
सोपें हेंचि साधन।
रामकृष्ण नारायण।
ऐसें पुरुषोत्तम सांगत ॥३॥
सेना म्हणे देवाधिदेवा।
आम्ही करावी तुझी सेवा।
हेंचि मागतों केशवा ।
नित्य रहावें मजपाशीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

असतां वैकुंठासी काय सांगें – संत सेना महाराज अभंग – ८३