Skip to content
आम्हां एकविध भाविकांची – संत सेना महाराज अभंग – ८२
आम्हां एकविध भाविकांची जाती ।
न जाणे निश्चिती दुजें कांहीं ॥१॥
खूण जाणे चित्तीं ्षोभ उपजेना ।
कळवळुनि स्तना लाव पाळी ॥२॥
अवघे होऊ येतें तुज वाटे चित्तें ।
उपासने परतें नावडे कांहीं ॥३॥
डोळा मुख पाहूं मुखीं नाम गाऊं।
सेना म्हणे पाहूं जळींस्थळीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्हां एकविध भाविकांची – संत सेना महाराज अभंग – ८२