पुत्राचिया ओढी बाप करी – संत सेना महाराज अभंग – ८१

पुत्राचिया ओढी बाप करी – संत सेना महाराज अभंग – ८१

पुत्राचिया ओढी बाप करी जोडी ।
वाळवुनि कुरवंडी आपणा करी ॥१॥
मिरासीचा धनी करुनी ठेविला।
भार तो वाहिला कडिये खांदी ॥२॥
घाली अलंकार कौतुक डोळा पाहे।
ठेवा दावी काय आहे तोचि ॥३॥
दुजियांनीं कोणी गांजितां तयासी ।
उदार जीवासी सेना म्हणे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुत्राचिया ओढी बाप करी – संत सेना महाराज अभंग – ८१