Skip to content
ऐकिलें मागें तारिले – संत सेना महाराज अभंग – ८०
ऐकिलें मागें तारिले बहुता।
धांवसी की आतां नाम घेतां ॥१॥
बरव्यापरी मज ऐसे कळों आलें ।
म्हणउनी विठ्ठलें करी धावा ॥२॥
पडिला विसरू माझा तुजलागी।
आतां पांडुरंगीं करणें काय ॥३॥
तुजलागि माझी नयेचि करुणा ।
धरिलें कीं जाण दुरीं मज ॥४॥
सेना म्हणे आतां सांभाळी नारायणा ।
जाऊं पाहे प्राण तुजसाठीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ऐकिलें मागें तारिले – संत सेना महाराज अभंग – ८०