ब्रह्मादिक पडती पायां – संत सेना महाराज अभंग – ८संत सेना महाराज ब्रह्मादिक पडती पायां – संत सेना महाराज अभंग – ८ ब्रह्मादिक पडती पायां । जे शरण पंढरीराया ॥१॥ मोक्ष मुक्ती लोटांगणीं । उभ्या तिष्ठती आंगणीं ॥२॥ सूर्यसुत शरणागत । येउनी चरणीं लागत ॥ ३॥ काया मने वाचा। सेना शरण विठोबाचा ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. ब्रह्मादिक पडती पायां – संत सेना महाराज अभंग – ८