ठेविला पाय माथा संतजनीं। तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥१॥ घालीन लोटांगण वंदीन पाय माथा। पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥२॥ सेना म्हणे धन्य धन्य झालों देवा। न करितां सेवा भेटी दिली ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.