अन्यायी अपराधी लडिवाळ – संत सेना महाराज अभंग – ७८
अन्यायी अपराधी लडिवाळ – संत सेना महाराज अभंग – ७८
अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥१॥
समर्थाचे बाळ समर्थचि जाणें।
वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥२॥
अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी।
तरी क्षमा करी मायबापा ॥३॥
कल्पतरू छाया बैसला सेना न्हावी।
दया ते वागवी बहु पोटीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अन्यायी अपराधी लडिवाळ – संत सेना महाराज अभंग – ७८