तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ॥१॥ तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥२॥ आमुचें तें आम्ही केलेंसे जतन । अंतर तुम्हांकूण न पडावा ॥३॥ समर्थाचे असे वचन प्रमाण। शरणागता जाण जतन जीवी ॥४॥ तुझा म्हणविलों सांभाळी जी आतां । न घे अपेश माथा सेना म्हणे ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.