Skip to content
लेकुराची आळी मायबापापुढें – संत सेना महाराज अभंग – ७४
लेकुराची आळी मायबापापुढें।
पुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥१॥
करावा सांभाळ सर्वस्वी गा आतां ।
कांहो अव्हेरितां जवळीचा ॥२॥
आम्हांवरी चाले सत्ता आणिकांची।
थोरीव तुमची काय मग ॥३॥
आला सेना न्हावी पायांपें जवळी ।
आतां टाळाटाळी नकां करूं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
लेकुराची आळी मायबापापुढें – संत सेना महाराज अभंग – ७४