माझा केला अंगीकार – संत सेना महाराज अभंग – ७२
माझा केला अंगीकार – संत सेना महाराज अभंग – ७२
माझा केला अंगीकार।
काय जाणे मी पामर ॥१॥
देव दीनाचा दयाळ।
शरणागता पाळी लळा ॥२॥
प्रल्हाद कारण ।
प्रगटला नारायण ॥३॥
मीराबाईसाठीं।
केवढी केली आटाआटी॥४॥
शरण रिघा पंढरीराया।
सेना न्हावी लागे पाया ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
माझा केला अंगीकार – संत सेना महाराज अभंग – ७२