आतां ऐसे करीगा देवा। तुझी घडो पाय सेवा ॥१॥ मनामाजी दुर्बुद्धी। न यावी माउलिये कधीं॥२॥ चित्तीं भाव जो धरिला। सिद्धी न्यावाजी विठ्ठला ॥३॥ सेना म्हणे याविण कांहीं। लाभ दुसरा नाहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.