अन्यायी अन्यायी – संत सेना महाराज अभंग – ६४
अन्यायी अन्यायी – संत सेना महाराज अभंग – ६४
अन्यायी अन्यायी।
किती म्हणून सांगो काई। ॥ १॥
तूं तो उदाराचा राणा।
क्षमा करी नारायणा ॥२॥
काम क्रोध लोभ मोहो ।
नाडिलों याचेनि पहाहो ॥ ३॥
नावडे संतसंगती।
नाहीं केली हरिभक्ती ॥४॥
निंदा केली भाविकांची ।
चित्तीं आस धनाची ॥५॥
सेना पायांचा पुतळा।
तुज शरण जी दयाळा ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अन्यायी अन्यायी – संत सेना महाराज अभंग – ६४