संताचे पाय मस्तकीं – संत सेना महाराज अभंग – ६२

संताचे पाय मस्तकीं – संत सेना महाराज अभंग – ६२

संताचे पाय मस्तकीं ।
सरता झालों तिहीं लोकीं ॥१ ॥
लोळेन चरणावरी ।
इच्छा फिटेल तोंवरी ॥२॥
नाहीं सेवा केली।
मूर्ती डोळां म्यां देखिली ॥३॥
कृतकृत्य झाला सेना न्हावी।
ठेविली पायांवरी डोई॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संताचे पाय मस्तकीं – संत सेना महाराज अभंग – ६२