विटेवरी उभा – संत सेना महाराज अभंग – ६

विटेवरी उभा – संत सेना महाराज अभंग – ६


विटेवरी उभा।
जैसा लावण्याचा गाभा ॥१॥
पायीं ठेउनियां माथा ।
अवघी वारली चिंता॥२॥
समाधान चित्ता।
डोळा श्रीमुख पाहतां ॥३॥
बहू जन्मी केला लाग।
सेना देखे पांडुरंग ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विटेवरी उभा – संत सेना महाराज अभंग – ६