प्रेमसुखें कीर्तन – संत सेना महाराज अभंग – ५८
प्रेमसुखें कीर्तन – संत सेना महाराज अभंग – ५८
प्रेमसुखें कीर्तन।
आनंदें गाऊ हरीचे गुण ॥१॥
धरिला वैष्णवांचा संग ।
नाहीं लाग कळीकाळा॥२॥
स्वल्प मंत्र हाचि जाण।
राम कृष्ण नारायण ॥३॥
वाचे न उच्चारी कांहीं ।
याविण आणिक नाहीं ॥४॥
सेना म्हणे रंगलें ठायीं ।
माझें चित्त तुझें पायीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
प्रेमसुखें कीर्तन – संत सेना महाराज अभंग – ५८