प्रेमसुखें कीर्तन। आनंदें गाऊ हरीचे गुण ॥१॥ धरिला वैष्णवांचा संग । नाहीं लाग कळीकाळा॥२॥ स्वल्प मंत्र हाचि जाण। राम कृष्ण नारायण ॥३॥ वाचे न उच्चारी कांहीं । याविण आणिक नाहीं ॥४॥ सेना म्हणे रंगलें ठायीं । माझें चित्त तुझें पायीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.