आम्हां हेंचि अळंकार – संत सेना महाराज अभंग ५६
आम्हां हेंचि अळंकार – संत सेना महाराज अभंग ५६
आम्हां हेंचि अळंकार।
कंठीं हार तुळशीचें ॥ १॥
नाम घेऊं विठोबाचें ।
म्हणवूं डिंगर तयाचें ॥ २॥
चित्तीं चाड नाहीं न धरू आणिकाची कांहीं ॥३॥
सकळ सुख त्याचे पायीं ।
मिळे बैसलिया ठायीं ॥४॥
सेना म्हणे याविण कांहीं ।
मोक्ष युक्ति चाड नाहीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्हां हेंचि अळंकार – संत सेना महाराज अभंग ५६