घेतां नाम विठोबाचें – संत सेना महाराज अभंग – ५२

घेतां नाम विठोबाचें – संत सेना महाराज अभंग – ५२

घेतां नाम विठोबाचें।
पर्वत जळती पापांचे ॥१॥
ऐसा नामाचा महिमा ।
वेद शिणला झाली सीमा ॥२॥
नामे तारिले अपार।
महा पापी दुराचार ॥३॥
वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी।
नामें तारिला निर्धारीं ॥४॥
सेना बैसला निवांत।
विठ्ठल नाम उच्चारीत ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

घेतां नाम विठोबाचें – संत सेना महाराज अभंग – ५२