समचरण विटेवरी – संत सेना महाराज अभंग – ५
समचरण विटेवरी – संत सेना महाराज अभंग – ५
समचरण विटेवरी।
पाहतां समाधान अंतर्री ॥१॥
चला जाऊं पंढरीसी।
भेटुं रखुमाई वरासी ॥२॥
होती संतांचिया भेटी ।
सांगू सुखाचिया गोष्टी ॥३॥
जन्ममरणाची चिंता।
सेना म्हणे नाही आतां॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
समचरण विटेवरी – संत सेना महाराज अभंग – ५