शरणागत आहे वैभवाचा – संत सेना महाराज अभंग – ४९

शरणागत आहे वैभवाचा – संत सेना महाराज अभंग – ४९

शरणागत आहे वैभवाचा धनी।
सत्य भावें मानी अर्पिले तें ॥१ ॥
आपणा वेगळें नेदी उरो कांहीं।
भावेंचि दावी आपणामाजी ॥२॥
दशा आपली अंगा नेणें जाणे कांहीं ।
आपणाचि होय इच्छा त्याची ॥३॥
धाकुट्यासी माता करी स्तनपान।
सेना म्हणे जिणें बरें हेंचि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शरणागत आहे वैभवाचा – संत सेना महाराज अभंग – ४९