करितां परोपकार – संत सेना महाराज अभंग – ४८
करितां परोपकार – संत सेना महाराज अभंग – ४८
करितां परोपकार।
त्याच्या पुण्या नाहीं पार ॥१॥
करितां परपीडा ।
त्याच्या पापा नाही जोडा ॥२॥
आपुलें परावें समान ।
दुजा चरफडे देखून ॥३॥
आवडे जगा जें कांहीं।
तैसें पाहीं करावें ॥४॥
उघडा घात आणि हित ।
सेना म्हणे आहे निश्चित ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
करितां परोपकार – संत सेना महाराज अभंग – ४८