करितां परोपकार। त्याच्या पुण्या नाहीं पार ॥१॥ करितां परपीडा । त्याच्या पापा नाही जोडा ॥२॥ आपुलें परावें समान । दुजा चरफडे देखून ॥३॥ आवडे जगा जें कांहीं। तैसें पाहीं करावें ॥४॥ उघडा घात आणि हित । सेना म्हणे आहे निश्चित ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.