Skip to content
ऐसी आवडी आहे – संत सेना महाराज अभंग – ४५
ऐसी आवडी आहे जीवा ।
कैं पाहीन केशवा ॥१॥
माझी पुरवा वासना ।
सिद्धी न्यावी नारायणा ॥२॥
नलगे वित्त धन।
मुखीं नाम नारायण ॥३॥
सेना म्हणें कमळापती।
हेंचि द्यावें पुढती पुढती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ऐसी आवडी आहे – संत सेना महाराज अभंग – ४५