न्हावीयाचे वंशीं – संत सेना महाराज अभंग – ४१
न्हावीयाचे वंशीं – संत सेना महाराज अभंग – ४१
न्हावीयाचे वंशीं।
जन्म दिला ऋषीकेशी।
प्रतिपाळावें धर्मासी।
व्यवहारासी न सांडी॥१ ॥
ऐका स्वधर्मविचारी ।
धंदा करी दोन प्रहर ।
सांगितलें साचार ।
पुरणांतरीं ऐसें हें ॥ २॥
करूनियां स्नान ।
मुखी जपे नारायण।
मागुती न जाण ।
शिवूं नये धोकटी ॥३॥
ऐसे जे कां न मानिती।
ते जातील नरकाप्रती।
सकळ पूर्वज बुडविती।।
शास्त्रसंमती ऐसी हे॥४॥
शिरीं पाळावें आज्ञेसी।
शरण जावें विठोबासी।
सेना म्हणे त्यासी।
ॠषीकेशी सांभाळी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
न्हावीयाचे वंशीं – संत सेना महाराज अभंग – ४१