जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥ ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें ॥३॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक। ऐसा वेणुनादी काला दावा ॥४॥ ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर। ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥ सेना म्हणे खूण सांगितली संतीं । यापरती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.