Skip to content
तुज ऐसें वाटे देह व्यर्थ – संत सेना महाराज अभंग – ३९
तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा ।
द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥१॥
मग नाहीं नाम निजल्य जागा राम।
जन्मोनि अधम दुःख पावे ॥२॥
दासीगमनीं धीट विषयीं लंपट ।
जावया वाट अधोगती ॥३॥
नर्का जावयासी धरसील चाड ।
तरी निंदा गोड वैष्णवांची ॥४॥
सेना म्हणे नामाचें लावीं करि पिसें ।
जन्माल्या सायासें व्यर्थ जासी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुज ऐसें वाटे देह व्यर्थ – संत सेना महाराज अभंग – ३९