Skip to content
म्हणा हरी हरी – संत सेना महाराज अभंग – ३४
म्हणा हरी हरी।
अवघे सकळ नरनारी ॥१॥
येणें तुटेल बंधन।
भाग निवारील शीण ॥२॥
प्रेमें घ्यारे मुखीं नाम।
हरे सकळही श्रम ॥३॥
सेना म्हणे चित्तीं धरा।
बळकट रखुमाईच्या वरा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
म्हणा हरी हरी – संत सेना महाराज अभंग – ३४