नलगे योग तप – संत सेना महाराज अभंग – ३३
नलगे योग तप – संत सेना महाराज अभंग – ३३
नलगे योग तप।
करणें साटोप आम्हांसी ॥१॥
सोपे साधन आमुचें।
नाम गाऊं विठोबाचें ॥२॥
जो नातुडे धूम्रपानीं ।
राहे संपुष्टि येऊनि ॥३॥
जया नाहीं रूप ।
आम्हां कीर्तनीं समीप ॥४॥
सेना म्हणे लडिवाळ।
जाणो हरीसी निर्मळ ॥ ५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नलगे योग तप – संत सेना महाराज अभंग – ३३