Skip to content
बैसोनि कीर्तनांत – संत सेना महाराज अभंग – ३२
बैसोनि कीर्तनांत ।
गोष्टी सांगतो निश्चित ॥१॥
दुष्ट अधम तो खरा ।
येथुनियां दूर करा ॥ २॥
तमाखु ओढूनि सोडी धूर ।
दुष्टबुद्धि दुराचार ॥३॥
पान खाय कीर्तनांत ।
रुधिर विटाळशीचें पीत ॥४॥
त्याची संगती जयास ।
सेना म्हणे नर्कवास ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
बैसोनि कीर्तनांत – संत सेना महाराज अभंग – ३२