सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां – संत सेना महाराज अभंग – ३६
सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥१॥ पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥२॥ जंव नाहीं गेली अज्ञानाची भ्रांती। जंव नाहीं विरक्ती बाणली आंगीं ॥३॥ जीवाची तळमळ राहिली सकळ। मग ब्रह्मज्ञान कळे सेना म्हणे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां – संत सेना महाराज अभंग – ३६