करिसी खटपटी । पोटासाठीं आटा आटी ॥१॥ नाम घेतां विठोबाचें। काय तुझ्या वाचें वेंचे ॥२॥ धनाचिया आशा । वाउगा फिरसी दाही दिशा ॥३॥ जावें हरिकीर्तना । आवडेचि तुझ्या मना ॥४॥ सेना म्हणे ऐसा नरा। जवळूनि दूर करा ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.