Skip to content
हित व्हावें मनासीं – संत सेना महाराज अभंग – २१
हित व्हावें मनासीं।
दवडा दंभ मानसीं ॥१॥
अलभ्यलाभ येईल हातां।
शरण जावे पंढरिनाथा ॥२॥
चित्त शुद्ध करा ।
न देई दुजियासी थारा ॥३॥
हेचि शस्त्र निर्वाणीचें।
सेना म्हणे धरा साचें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
हित व्हावें मनासीं – संत सेना महाराज अभंग – २१