तेचि एक संत जाणा – संत सेना महाराज अभंग – १८

तेचि एक संत जाणा – संत सेना महाराज अभंग – १८

तेचि एक संत जाणा।
आवडती नारायणा ॥१॥
पांडुरंगा वांचोनि कांहीं।
न जाणे दुसरे पाही॥२॥
मुखीं नाम अमृतवाणी।
धाले मनीं डुल्लती ॥३॥
सेना म्हणे पायीं माथां।
त्यांच्या ठेवियला आतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तेचि एक संत जाणा – संत सेना महाराज अभंग – १८