म्हणविलों विठोबाचा दास – संत सेना महाराज अभंग – १६
म्हणविलों विठोबाचा दास – संत सेना महाराज अभंग – १६
म्हणविलों विठोबाचा दास।
शरण जाईन संतांस ॥ १॥
सदा सुकाळ प्रेमाचा।
नासे दुष्ट मळ बुद्धीचा ॥२॥
ऐकतां हरीचें कीर्तन।
अभक्त भक्ति लागे जाण ॥३॥
उभा राहे कीर्तनांत।
हर्षे डुले पंढरिनाथ ॥४॥
सेना म्हणे हेंचि सुख ।
नाहीं ब्रह्मयासि देख ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
म्हणविलों विठोबाचा दास – संत सेना महाराज अभंग – १६