वैकुंठवासिनी कृपावंत माउली – संत सेना महाराज अभंग – १३२
वैकुंठवासिनी कृपावंत माउली – संत सेना महाराज अभंग – १३२
वैकुंठवासिनी कृपावंत माउली।
जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥
शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई।
ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥२॥
येउनी प्रतिष्ठानी पशुवेद बोलविला ।
पंडित ब्रह्मज्ञानी यांचा गर्व हरिला ॥३॥
तप्तीतीरवासी चौदाशे वर्षांचा होता ।
तयाचा अभिमान गर्व हरी आदिमाता ॥४॥
वाळितां ब्राह्मणीं स्वर्गाचे पितर आणविले।
सेना म्हणे जगीं पूर्णब्रह्म अवतरलें ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वैकुंठवासिनी कृपावंत माउली – संत सेना महाराज अभंग – १३२