Skip to content
ब्रह्मियाचा अवतार – संत सेना महाराज अभंग – १३१
ब्रह्मियाचा अवतार ।
तो हा सोपान निर्धार ॥१॥
याचे घेतां मुखीं नाम ।
हरे सकळही श्रम ॥२॥
समाधीपासुनी भागीरथी ।
स्नानालागी नित्य येती ॥३॥
अष्टोत्तर तीर्थाचा मेळा ।
नाम कऱ्हाबाई वेल्हाळा ॥४॥
वैष्णवांमाजी डिंगर ।
सेना तयाचा किंकर ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ब्रह्मियाचा अवतार – संत सेना महाराज अभंग – १३१