नामयाचा धरूनि हात – संत सेना महाराज अभंग – १२९

नामयाचा धरूनि हात – संत सेना महाराज अभंग – १२९


नामयाचा धरूनि हात।
सांगे संवत्सराची मात।
विठोजि म्हणे देई चित्त ।
ऐक गुह्यार्थ सांगतो ॥१॥
ही पुण्यभूमी पवित्र देखा ।
याची मूळ आदि पीठिका।
सिद्धेश्वर नागेंद्र देखा ।
पुरातन नांदती ॥२॥
या इंद्रनील पर्वतीं तप तपिन्नले अमरपती।
आणि सूर्यमूखा वरुती ।
प्रत्यक्ष मूर्ति श्रीशंकराची ॥३॥
ही स्मशानभूमिका आधीं।
येथें सोपान देवा समाधी।
पुढें राहिला कैलासनिधी।
सन्मुख वाहे भागीरथी ॥४॥
इची करितां पंचक्रोशी।
चुके जन्ममरण चौऱ्यांशी ।
चारी मुक्ती होती दासी।
येउनि चरणासी लागती ॥५॥
तो हा सोपान निधान ।
याचे करितां नामस्मरण।
सेना कर जोड़ून ।
जाती जळून महादोष ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामयाचा धरूनि हात – संत सेना महाराज अभंग – १२९