श्रीज्ञानराजें केला उपकार – संत सेना महाराज अभंग – १२८
श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥१॥ विटेवरी उभा वैकुंठनायक। आणि पुंडलिक चंद्रभागा ॥२॥ अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें ॥३॥ सेना म्हणे चला जाऊं तया ठाया। पांडुरंग सखया भेटावया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
श्रीज्ञानराजें केला उपकार – संत सेना महाराज अभंग – १२८